0
4
8
2
8
7
मनधरणी
तुझा हा रुसवा-फुगवा
सखे सोड ना अबोला
मनधरणी करता तुझी
बेजार जीव हा झाला
वाटते मजला ही प्रिये
कधी मी रुसून बसावं
तू करतांना मनधरणी
मी हळूच गाली हसावं
सोड ना तुझा रुसवा
सखे सोड हा बहाणा
लाडीगोडीने गुलूगुलू
माझ्याशी जरा बोल ना
रुसण्यात मजा वाटते
म्हणूनचं तू का रुसते?
मनधरणी करूनचं बघ
ती पण भारीच असते
जन्मसिद्ध हक्कच का?
तुझाच सदा रुसण्याचा
मलाही मिळू दे आनंद
तू मनधरणी करण्याचा
बी. एस. गायकवाड
पालम, परभणी
0
4
8
2
8
7



