0
4
8
2
9
3
लबाड चिमणी
चिऊताई चिऊताई
ये ना माझ्या अंगणी
देईन मी तुला बरं
चार अन् पाणी
तुझ्यासाठी ठेवेन मी
मऊ कापसाची गादी
तिथे तू सावकाश
घरटे बनव आधी
चिऊताई चिऊताई
अंडी तुझी इटूकली
ऊब दे त्यांना थोडी
पिल्लू येतील पिटुकली
घे ग दाणा पाणी
नको जाऊ दूर
पिल्लाना घास भरव
राहू नको दूर
पिल्लू मोठे होताच
चिऊताई उडाली भुर्रकन
अशी ही लबाड चिमणी
येईल का पुन्हा भुर्रकन
सुनंदा किरसान
अर्जुनी मोर गोंदिया
0
4
8
2
9
3



