सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????स्पर्धेचा विषय:शपथ तुला आहे????*
*????सोमवार : १६ / १२ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*शपथ तुला आहे*
अखेरचा रक्तथेंब हा तुझ्याचसाठी
पुन्हा येईन तुझ्याच पोटी
भारतमाते शपथ तुला आहे
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*शपथ तुला आहे*
दिल्या घेतल्या वचनांची
शपथ तुला आहे विसरू नको
प्रतारणा करू नकोस प्रेमाची
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*शपथ तुला आहे*
शिवार सारे पडले कोरडे
घाल तया अंगी सडे
वरुणा शपथ तुला आहे
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*शपथ तुला आहे*
तुझ्यावरच्या प्रत्येक कवितेची
सखे शपथ तुला आहे
केवळ नव्हती भरारी कल्पनेची..
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*शपथ तुला आहे*
नको करू काळजी परिवाराची
शपथ तुला आहे सख्या
देशरक्षा खरी जबाबदारी सैनिकांची
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*शपथ तुला आहे*
कूस उजवली नाही तुझी जरी
हो माऊली अनाथ बालकांची
शपथ तुला आहे गं सिंधुमाईंची
*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*शपथ तुला आहे*
*माझी शपथ तुला आहे*
*मला स्मरशील ना?*
*इतुके उपकार करशील ना?*
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*शपथ तुला आहे*
*शपथ तुला आहे मित्रा*
*साथ सोडणार नाही कधी*
*संकटं समयी मदतीला आधी*
*श्री. राजेश लक्ष्मीकांत धात्रक*
*ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*शपथ तुला आहे*
दादा शपथ तुला आहे
जनतेला दिलेल्या वचनपूर्तीची
हाती अजूनही वेळ आहे
*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*शपथ तुला आहे*
परिसीमा झाली अन्याय अधर्माची
श्रीकृष्णा! शपथ तुला आहे
गीतेत दिलेलं वचन पाळण्याची.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.????*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन /मुख्य प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖





