बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाटोदा गावात शिरले पाणी
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पाटोदा गावात शिरले पाणी
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड: जिल्ह्यातील पाटोदा गावात प्रथमच प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी शिरून ग्रामपंचायतच्या मैदानात असलेली व्यावसायिकांचे दुकाने पाण्याने तुडुंब भरून व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
शेतकऱ्यांच्या हातात आलेली पीक यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल अनेक शेतकऱ्यांचे जनावरे, शेतीला लागणारे अवजारे, बैलगाडी पाण्यात वाहून गेल्या पाण्याचा एवढा प्रचंड वेग होता व मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अडचणी पासून बचाव करण्यास वेळ मिळाला नाही, शेतात गेलेले शेतकरी शेतातच अडकल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली रात्र झाडावर बसून काढली.
गावच नवीन ग्रामपंचायत कार्यालय हे पाण्याखाली होत, गावातील 100 ते 150 घर पाण्याखाली गेल्याने पाटोदा गावातील जनजीवन विस्कळीत झाले असल्याची बातमी कळताच आपत्ती व्यवस्थापन टीम कडून नागरिकांना घराच्या बाहेर काढण्याचे बचाव कार्य करण्यात आले, अनेक नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र कशीबशी काढली रात्रभर गावातील नागरिक हे झोपली नाहीत.
अनेक वयोवृद्ध नागरिक सांगतात की असे भयानक दृश्य या अगोदर कधीही पाहण्यास मिळाले नाही काल पडलेला पाऊस व नदीपात्रात आलेली अचानक पाणी यामुळे नागरिकांना यातून आपले कोणतेही साहित्य हलवण्यास वेळ मिळाला नाही त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे धान्य व घरातील अनेक वस्तू ह्या पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले.
पाटोदा गावात बांधण्यात आलेला नदीवरचा नवीन पूल हा देखील रात्री पाण्याखाली होता नवीन पुलाच्या कठड्यावरून पाणी वाहत होते.आजची पावसाची परिस्थिती कायम आहे पाऊस सुरूच आहे त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी,नागरिकांनी सतर्क राहावे, सुरक्षित ठिकाणी थांबावे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची सुरक्षा करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.





