Breaking
कवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

सांज; अरविंद उरकुडे

गडचिरोली

0 4 8 2 9 0

सांज

केशरी भस्म फासले
आकाशाच्या भाळी
क्षितीजावर रंगोत्सव
साजरा सांजवेळी

कंठात नभाच्या शोभे
खगांच्या मोतीया माळा
गालावर तिट टिळा
उमटवे ढग काळा

दरवळे चराचरात
गंधीत वायू लहरी
अत्तरांचे शिंपण
धरती ते अंबरी

चांदण गोंदणाने
सजू लागते रात्र
देखणे रुप न्याहळे
दूरून शशी मित्र

नयनात सामावून
सांजचा नजारा
जड पावले वळती
प्रसन्न वदने घरा

अरविंद उरकुडे, गडचिरोली
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे