Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

तूच माझा रे श्वास

गोवर्धन तेलंग पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ

0 6 5 6 0 4

तूच माझा रे श्वास

जीवा लागला घोर , तूच माझा रे श्वास !
अभागी बळी मी,पावसा घेऊ का फास? !!

घामाच्या धारांनी, पेरणी केली शेताची !
उगवलं जोमाने , सार्थ पावले बिजास !!

अंतरी आनंदाने, मी बेफिकीर झालो!
ऐनवेळी पळाला ऋतू , हिरावून विश्वास!!

जगावं कसे जीवना ,मला कळेना आता !
ढगाआड चंद्र लपूनी,देतो कोरडा आभास !!

चिल्ले-पिल्ले फुलपाखरे धरणी वाट पाहते !
आभाळात झाले असे ,हे सौभाग्य खलास!!

तुजविण जगावया, कुणाची साथ नाही !
म्हणे वादळ हो त्सुनामी, धाव हीच आस !!

थेंबा- थेंबासाठी सारे हैराण आज आहेत!
तहान -भूक लागली मिळेना तोंडी घास !!

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 6 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे