Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

पणती… पण ‘ती’ कुठेच दिसली नाही..!

डॉ. राजेश काळे ‘राजस’ ता. जिल्हा नागपूर

0 6 3 9 5 4

पणती… पण ‘ती’ कुठेच दिसली नाही..!

दिवाळी आली, रोषणाई झाली,
दारोदारी पणत्यांची आरास सजली,
साऱ्या जगाला प्रकाश देताना,
पण ‘ती’ मात्र कुठेच दिसली नाही…!

घराची सजावट, फराळाची तयारी,
साऱ्यांच्या आनंदासाठी धावपळ सारी,
स्वतःच्या इच्छा बाजूला सारून,
पण ‘ती’ मात्र बाहेर कुठेच दिसली नाही…!

तुम्ही झगमगाटात मिरवत राहिलात,
तिच्या त्यागाचा विसर पाडत राहिलात,
LED च्या प्रकाशात ‘पणती’ हरवली,
आणि तिच्यासोबत पण ‘ती’ही हरवली….!

‘पणती’ जळते, तेव्हा अंधार दूर होतो,
‘ती’ झिजते, तेव्हा संसार उजळतो…
‘पणतीचा’ प्रकाश साऱ्यांना दिसतो,
पण ‘ती’चा त्याग कुणालाच दिसत नाही…!

म्हणूनच तर…
‘पणती’ प्रत्येक घरात दिसली ,
पण त्या पणतीसारखी जळणारी
पण ‘ती’ मात्र कुठेच दिसली नाही…!

डॉ. राजेश काळे ‘राजस’
ता. जिल्हा नागपूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 9 5 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे