
0
6
3
9
6
1
दीपावली
सण आला दिवाळीचा
हर्षोल्हासित झाले मन
बळीराजाचं यावं राज्य
ताईचं भावासाठी मागणं
अंधकार दूर सारण्या
प्रवास करु तेजाकडे
दीपावली मंगल व्हावी
प्रार्थना माझी ईश्वराकडे
अतुट नाते बहिणभावाचे
ओवाळून करीते औक्षण
भाऊबीजेच्या शुभदिनी
करया नात्यांचे संरक्षण
स्वप्ने नवी घेऊन येते
लक्ष दिव्यांची दिवाळी
ध्येय करु साध्य आपले
सारु निराशेची काजळी
दीपावली दिपोत्सवाची
प्रतिक शुभ मांगल्याचे
दृढ संकल्प साध्य करुया
महत्व जपुया उत्सवाचे
बळवंत शेषेराव डावकरे
ता.मुखेड जिल्हा नांदेड
======
0
6
3
9
6
1



