Breaking
ई-पेपरकवितानागपूरमराठवाडासाहित्यगंध

तिसरे पुण्यस्मरण डॉ.चोलाजी नाथाजी ठोकळ

बाप; मायादेवी गायकवाड

0 4 8 3 0 0

तिसरे पुण्यस्मरण डॉ.चोलाजी नाथाजी ठोकळ

२५/१२/२०२४

बाप

जोवर बाप होता तोवर
घराला धाक होता,
आदरयुक्त भीती वाटून
सर्वांना आधार होता.

रणरणत्या, उन्हात तुम्ही
शीतल सावली, होतात
विसाव्याला, हक्काचा
आधार,वटवृक्ष होतात.

सरली सावली, आबा
आणि सरला, आधार,
तुमच्या विना, पोरके
झालोत आता, निराधार.

मी आहे ना! हीं साद
अजूनही, कानी येते,
चाहूल, तुमची लागता
मी थबकून, पाहते.

सुख दुःखात व्यक्त होण्या
हक्काचा खांदा,नाही उरला,
आकाश सारं, फाटून जणू
दुःखाचा डोंगर, कोसळला.

घर,होते विटा मातीचे
त्यात जिव्हाळा,होता,
सरला मायेचा, ओलावा
राहिला फक्त उन्हाळा.

मध्यरात्री 2.25वाजता
24डिसेंबर, 2021ला
पाहून सर्वांना,डोळे भरून
अखेरचा श्वास का?सोडला.

दरवर्षी जमून,भावंडे
वाहतो,भावपूर्ण श्रद्धांजली.
डबडबलेल्या,नयनांनी
वाहतो,आजला पुष्पांजली.

अंधारात,चाचपडून
आबा,दिशाहीन झालोत,
फोटो तुमचा पाहून
पुन्हा भानावर येतोत.

एक एक,आठवण
आश्रू होऊन, ओघळते,
बाप असावा तर,असा
आदर्श,लोकांना मी सांगते.

मायादेवी गायकवाड
मानवत,जि.परभणी

2/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे