व्हिजन स्कूल मध्ये रक्तदान शिबीर
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
व्हिजन स्कूल मध्ये रक्तदान शिबीर
विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी केले रक्तदान
अमृता खाकुर्डीकर, पुणे प्रतिनिधी
पुणे-दि.23(प्रतिनिधी) वडगाव शेरी येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या व्हिजन इंग्लिश मीडियम शाळेमध्ये जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने शाळेचे संस्थापक स्वर्गीय नरहर जोशी यांच्या स्मृतिदिना निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते.
रक्तदानाचे महत्त्वं विद्यार्थ्याना समजावे आणि गरजूं रूग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध करून देण्याची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने व्हिजन स्कूलच्या सहकार्याने जनकल्याण रक्तपेढीने हा उपक्रम राबवला. सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत एकूण ८८ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक रक्तदात्याची तपासणी करूनच रक्तदान घेतले गेले. योग्य सुई, सॅनिटायझेशन व औषधे यांची व्यवस्था सुसज्ज होती. रक्तदात्यांना सहभाग प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले.
आयोजित शिबिरासाठी ज्येष्ठ भुलतज्ञ डॉ. रामचंद्र सिद्धये आणि डॉ. ऋतुजा पाटील, तसेच जनकल्याणच्या वैद्यकीय अधिकारी सौ माधुरी बर्वे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिथ होते. सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गलांडे, पौर्णिमा गादिया, कर्वे शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक प्रदीप नाईक,माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ममता जैन आणि प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ. रेश्मा कारळे यांच्या उपस्थितीत रक्तदान कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदना गायनाने झाला. डॉ. सिद्धये आणि डॉ. ऋतुजा यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. माधुरी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगून उपस्थित पालकांनाही रक्तदानाचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मेघा खोगरे यांनी केले. शोभना शुक्ला यांनी आभार मानले.
शाळेचे शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी यांनी उस्फूर्तपणे रक्तदान मोहिमेत सहभाग घेतला. रक्त
दात्यांमध्ये महिलांचे प्रमाण उल्लेखनीय होते. यावेळी अनेकांनी नियमित रक्तदानाचा संकल्प केला. अशा उपक्रमामुळे समाजात माणुसकीचा संदेश पोहोचतो, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



