Breaking
ई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

महाराष्ट्र दिवस

डॉ. राजेश चंद्रकांत काळे ता. जिल्हा नागपूर

0 5 5 8 5 8

महाराष्ट्र दिवस

एक मे एकोणवीसशे साठ ,
बांधली मुंबई व विदर्भाशी गाठ ,
उदयास आले नवे राज्य ,
महाराष्ट्र माझा उभा स्वाभिमानाने ताठ

इतिहास या राज्याचा तितकाच खास ,
शिवरायांवर आमचा अटूट विश्वास ,
कित्येक नक्षत्र फुलली या मातीत ,
कित्येक शूरवीर लढले या मातीत .

जिल्हे छत्तीस तालुके तिनशे अट्ठावन्न जाहले
भाषा साठ त्यातली मराठी माझी खास
बोली भाषा मराठी, राज्यभर अलंकृत जाहले ,
सर्वांनी भाषेचे अभिमान जागले .

कृष्णा, गोदावरी, नर्मदा, मांजरा
नद्या इथल्या पवित्र फार
किल्ले रायगड, शिवनेरी, जंजिरा,
डोंगरे ही डौलदार ,

शेकरू इथला राज्यपशू , राज्य पाखर हरियाल,
आंबा राज्य वृक्ष ,जारूल जाहले राज्यफूल,
मुद्रा शिवाजींचे कोरले राज्य घटनेवर बहुल

टिळक आंबेडकर सावरकर इथले ,
फुले, लता ही इथली हो ,
कुणा कुणाचे नाम स्मरावे ,
सारेच ईथे वंदनीय हो .

मराठी असल्याचा मान आम्हाला ,
गर्व आम्हाला, अभिमान आम्हाला ,
महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर ,
शब्द शुभेच्छांचा वर्षाव तुम्हाला.

डॉ. राजेश चंद्रकांत काळे
ता. जिल्हा नागपूर
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 5 8 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे