Breaking
अलिबागमहाराष्ट्ररायगड

“जे. एस. एम. महाविद्यालयात भारतीय तटरक्षक दलातील करिअरच्या विविध संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन”

तुषार थळे

0 6 5 5 8 2

“जे. एस. एम. महाविद्यालयात भारतीय तटरक्षक दलातील करिअरच्या विविध संधी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन”

तुषार थळे
बिनधास्त न्यूज प्रतिनिधी
अलिबाग, जि. रायगड

अलिबाग – दि. 20/11/2026: जे. एस. एम. महाविद्यालयात ‘50 Years of Steadfast Vigilance’ निमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

भारतीय तटरक्षक दलाच्या गौरवशाली सेवेची ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने (‘50 Years of Steadfast Vigilance’) जनता शिक्षण मंडळाच्या जे. एस. एम. महाविद्यालय, अलिबाग येथे विद्यार्थ्यांसाठी भारतीय तटरक्षक दलातील करिअरच्या विविध संधींबाबत विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी भारतीय तटरक्षक दलाचे जे. जी. कमांडर श्री. अरुणकुमार आणि श्री. गुरदीप सिंग हे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील होत्या. तसेच या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत आणि महाविद्यालयातील एन. सी. सी. कॅडेट्स आणि एन. एस. एस. स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. डॉ. गौतम पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या व सांगितले कि या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना कॅरिअरची दिशा ठरविण्यासाठी निश्चित मदत होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सोनाली पाटील यांनी केले त्यांनी आपल्या प्रस्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय तटरक्षक दलाची कार्यप्रणाली, देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण, सागरी सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीतील महत्त्वपूर्ण भूमिका यांची माहिती देणारी लघुपट दाखविण्यात आली. त्यानंतर जे. जी. कमांडर श्री. अरुणकुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय तटरक्षक दलातील अधिकारी व इतर विविध पदांवरील भरती प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, आवश्यक कौशल्ये, प्रशिक्षण आणि उपलब्ध करिअरच्या संधी यांविषयी सविस्तर माहिती दिली. देशसेवेची आवड, शिस्त, साहस, आत्मविश्वास आणि समर्पण या गुणांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.

या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना भारतीय तटरक्षक दलातील करिअरच्या संधींची माहिती मिळण्याबरोबरच देशाच्या सागरी सुरक्षेमध्ये योगदान देण्याची प्रेरणा मिळाली.

यानंतर विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा आणि रस्सीखेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. प्रवीण गायकवाड यांनी केले.

भारतीय तटरक्षक दलाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली असून, भारतीय तटरक्षक दलातील रोजगार व करिअरच्या नव्या संधींची दालने खुली झाली आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 5 5 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे