Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्रमुंबई

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये पौष्टिक खाऊचे वाटप

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये पौष्टिक खाऊचे वाटप

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: शुक्रवार दि. २१ मार्च २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात लायन्स क्लब – अलिबाग मांडवा आणि राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ यांच्या संयुक्त विद्यमाने इ. ५ वी ते इ. ९ वी च्या विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ [ सुकामेवा ] चे वाटप करण्यात आले.

सर्व प्रथम विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे यथोचित स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून पौष्टिक खाऊचे महत्त्व सांगून शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ वाटप केल्याबद्दल लायन्स क्लब – अलिबाग मांडवा व राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ यांचे आभार मानले.

त्यानंतर लायन्स क्लब – अलिबाग मांडवाचे लायन सुमित पाटील यांनी आपल्या मनोगतातून पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगितले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते इ. ५ वी ते इ. ९ वी मधील प्रत्येक विद्यार्थ्याला पौष्टिक खाऊचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला लायन्स क्लब अलिबाग मांडवाचे अध्यक्ष लायन जितेंद्र ठाकूर, लायन नितिन दांडेकर, लायन अमरेश शिरगावकर, लायन आमिष शिरगावकर, लायन सागर पाटील, लायन सुमित पाटील, लायन सुधिर पूरो, लायन सुनिता पूरो, लायन चंद्रकांत मल्हार, लायन विद्या अधिकारी, लायन अजय आंगणे, लायन सुबोध राऊत, लायन मोहन पाटील, मुख्याध्यापक/ प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर यांनी तर आभार प्रदर्शन सुनील मोरे सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे