0
4
8
2
9
0
तूच माझी सावली
सुखदुःखात देवा सदा
तूच माझी सावली
दीनांचा पाठीराखा तुच
तूच भक्तांची माऊली
निशीदिनी अंतरात
स्पंदन तुझ्या नामाचे
धावशी तू संकटात
रक्षण करितो भक्तांचे
दीन दुबळ्या पाठी तू
उभा खंबिर आधार
देतो आभाळाची माया
जगी आहे जे निराधार
दुःख निवारण्या तू
धावला क्षणोक्षणी
तुझ्या नामातच वाटे
आनंद खरा जीवनी
तुझ्या अस्तित्वाने खरे
मन माझे शांत,खंबिर
विकारांची केली होळी
चरणी तुझ्या नत हे शिर
सुलोचना मुरलीधर लडवे
साईनगर,अमरावती
========
0
4
8
2
9
0



