Breaking
ई-पेपरकवितागडचिरोलीभंडाराविदर्भसाहित्यगंध

कशी भागवू भुक

अर्चना राजू ईंकने आरमोरी, जि.गडचिरोली

0 4 8 2 9 0

कशी भागवू भुक

नाही कुटुंब नियोजन
परिस्थिती बिकट झालेली
मुलांची कशी भागवू भुक
चिंता मनाला लागलेली

वादळ ,वारा,ऊन, पाऊस
अंगावर झेलून कष्ट करतो
छोट्याशा खांद्यावर
ओझं जबाबदारीने नेतो

भूक भागविण्यासाठी
इथे प्रत्येकजण धडपडतो
भूकेसाठीच रात्रंदिवस
जीव राब राब राबतो

स्वप्नांचा बाजार सारा
व्हावे शिकून मोठे
निरागस नजरेत
भाव मनातील दाटे

जगाचा पोशिंदा असला तरी
भूकेची चिंता आहे
आयुष्याच्या वळणावरी
गरिबीमुळे मागे राहे

अर्चना राजू ईंकने
आरमोरी, जि.गडचिरोली
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे