0
4
8
2
9
3
तुझ्या रुपाचं चांदणं
स्पर्शगंध तुझा दरवळे
सखे माझ्या भवताली
तुझ्या रुपाचं चांदणं
पौर्णिमाच अंगणी आली
माझ्या डोळ्यांच्या ऎन्यात
तुझे प्रतिबिंब साजिरे
लावण्य दैवी मूर्तिमंत
धरेवरी असे अवतरे
पोवळ्यापरी अधर तुझे
हास्य मोहोळ मधाचे
गोऱ्या गालावरी खुलते
हिरवे गोंदण लाडाचे
केतकी रंग तुझा भुलवी
अधरी हुंकार दाटला
कसे अंतरात उठलेल्या
आवरू मी गं वादळाला
नयनांची तव भाषा
जाणली मी विलासिनी
वेड्यापिशा मम मनाला
कमल मिठीची मोहिनी
वृंदा (चित्रा) करमरकर
जिल्हा सांगली
=========
0
4
8
2
9
3



