0
4
8
2
9
3
संवेदना
तू सांज हो…
मी सांजवात होईन
तेलातल्या वातीसम
स्वतःस तेवत ठेवीन
तू माध्यान्ह हो…
मी वृक्ष छाया देईन
तप्त तुझ्या किरणांना
अंगावर झेलून घेईन
तू हो चंद्र नभीचा…
मी तारका होऊन येईन
तुझ्या वरील सश्यागत
मी कुशीत दडून जाईन
ही संवेदना सुह्रदयाची
मनात जपून ठेवीन….
उलटेल क्षण काळ जरी
मजसमीप तुज पाहीन…
वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
==========
0
4
8
2
9
3



