आवास [ भगत आळी ] मध्ये श्री सत्यनारायणाच्या महापूजेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
आवास [ भगत आळी ] मध्ये श्री सत्यनारायणाच्या महापूजेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: गेल्या अनेक वर्षांच्या परंपरे प्रमाणे यावर्षीही आवास गावातील भगत आळी येथील एस्कर बाप्पा मंदिरात आवास [ भगत आळी ] ग्रामस्थांनी शनिवार दि. १७ मे २०२५ रोजी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन केले होते. पूजेला पराग अविनाश भगत व कोमल पराग भगत हे नव दांपत्य बसले होते. श्री सत्यनारायण पूजा विधी, मंत्रोच्चार व पोथी वाचन महादेव मोघे या ब्राह्मणांनी केले.
श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने भाविकांनी श्री एस्कर बाप्पा व श्री सत्यनारायणाचे दर्शन घेऊन तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने रात्री ठीक ९.३० वाजता श्री. काळभैरव प्रासादिक संगीत भजन मंडळ, आवास [ भगत आळी ] यांचा अतिशय सुंदर असा संगीत भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. श्री सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आवास भगत आळीतील सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.



