बाबासहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
बाबासहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवासमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: सोमवार दि. २३ डिसेंबर व मंगळवार दि, २४ डिसेंबर २०२४ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या मार्गदर्शनातून शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे यांच्या अध्यक्षतेखाली क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा रेल्वे पोलीस, मुंबई विशाल कवळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे सचिव प्रभाकर म्हात्रे, माजी वरिष्ठ लिपिक प्रकाश राणे सर, विद्यमान मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, शिक्षकेतर प्रतिनिधी तथा स्नेहसंमेलन अध्यक्ष गणेश राणे सर, स्नेहसंमेलन उपाध्यक्ष नथुराम म्हात्रे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले. त्यानंतर मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचीत स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा रेल्वे पोलीस, मुंबई विशाल कवळे यांच्या शुभहस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे विशाल कवळे यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडांगणाचे पूजन करून श्रीफळ वाढवण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर यांनी तर आभार प्रदर्शन दिव्या भगत मॕडम यांनी केले. दोन दिवस चाललेल्या या शालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो – खो, लंगडी या स्पर्धांचे आयोजन करण्यत आले होते.विद्यार्थ्यांनी दर्जेदार खेळाचे व खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन केले. क्रीडा महोत्सवासाठी माजी मुख्याध्यापक / माजी प्राचार्य प्रमोद भगत सर, गणेश राणे सर, विशाल पाटील सर व प्रियंका राणे मॕडम यांनी आतिशय मेहनत घेऊन क्रीडांगणे तयार केली तसेच अतिशय सुंदर असे नियोजन केले.
क्रीडा महोत्सव यशस्वी होण्यासाठी ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.





