
0
6
5
0
7
2
दोन्ही चिमण्या
दोन्हीही चिमण्या आहेत
जणू दोन तेजस्वी तारे
त्यांच्या हास्याने उजळले
दोघांचेही जीवन सारे…!!
लेकी मायेचा अखंड झरा
लेकी आहेत हळवी फुले
लक्ष्मीची पावले दोघींची
परिवार अंगण बहरले…!!
शिकून मोठ्या झाल्या नि
झाले जणू आकाश ठेंगणे
ऊरी दाटलाय अभिमान
केलेय जीवनाचे हो सोने ..!!
नाहीत त्या कोणाला भार
सुशिक्षित नि सुसंस्कारी
पंख केलेत बळकट फार
कर्तृत्वाची गगनी भरारी..!!
दोन्ही चिमण्या सुखी ठेव
नित्य प्रार्थना देवाचरणी
यश कीर्ती सन्मान लाभो
आनंद आरोग्य जीवनी..!!
राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
0
6
5
0
7
2



