Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरकवितासाहित्यगंध

अभिलाषा

डाॅ.नझीर शेख राहाता

0 4 8 2 9 0

अभिलाषा

उगाच अति प्राप्तीची
अभिलाषा नको
दुसर्‍यांशी अरेरावीची
कधी भाषा नको

जे लाभले ते
शिरोधार्य मानावे
अकारण मनामध्यें
निराशा नको

सुखस्वप्नें पूर्ण होण्यास
प्रयास हवेत
लाभले न काही
तर हताशा नको

सदा तृप्त दिसावे
हसतमुख रहावे
म्लान चेहरा नसावा
व्यर्थ उसासा नको

स्वतःशीच स्वतः
रहावे प्रांजळ
समाधानाची अन्य
परिभाषा नको

डाॅ.नझीर शेख राहाता
जि.अहिल्यानगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे