कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
तारतम्य; सरला टाले
0
4
8
2
9
3
तारतम्य
तारतम्य राखले जावे
वागण्यात आणि बोलण्यात
मनात एक ओठात एक
नको खोटा आव जगण्यात ॥
का कुणास ठाऊक
हरवत चाललीय नैतिकता
मदतीचा हात पुढे करता
बदनाम होतेय मानवता ॥
गैरसमजाचे जाळे पसरता मनावर
अविश्वासाची पट्टी बांधली जाते डोळ्यावर
सत्य काहीच दिसत नाही
असत्य कोरून ठेवतो हृदयावर ॥
आपलेच काही चुकले असेल
पद्धतशीरपणे विसरून जातो
आत्मचिंतन न करता
दुसऱ्यांना दोष देत बसतो ॥
तारतम्य नसता शब्दात
बोचरे बाण सोडले जातात
हळवी मने , भिजले नेत्र
दूर दूर निघून जातात ॥
करावा का थोडा विचार
कसे जगतो आपण
स्वतःलाच स्वतः प्रश्न विचारून
करीत रहावे सदा अध्ययन ॥
सरला टाले, राळेगाव
जि.यवतमाळ
========
0
4
8
2
9
3



