Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणे

मानसिक दिव्यांग मुलांशी सुसंवाद व सदिच्छा भेट

वसुधा नाईक पुणे

0 4 8 3 0 1

मानसिक दिव्यांग मुलांशी सुसंवाद व सदिच्छा भेट

वसुधा फाऊंडेशनतर्फे मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

वसुधा नाईक पुणे

पुणे:दि. 10/08/2025 रोजी नरवडे, ता. मुळशी, जि. पुणे येथील दिव्यांग मानसिक मुलांशी सुसंवाद, साधून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अनिकेत सेवाभावी संस्था मानसिक दिव्यांग मुला-मुलींचे निवासी पुनर्वसन प्रकल्प या निवासी संकुलला वसुधा फाउंडेशनच्या वसुधा वैभव नाईक, संस्थापिका, व काव्ययोग संस्थेचे संस्थापक योगेश हरणे व युवा क्रांती टीम यांच्यामार्फत भेट देण्यात आली. या संस्थेच्या संस्थापिका मा. कल्पना वरपे मॅडम आहेत.

त्यांचा स्वतःचा मुलगा मानसिक दिव्यांग आहे. त्याचे ऍडमिशन त्यांनी साईनगरी,शिर्डी येथे केलेले होते. तेथील नियोजनामध्ये त्यांना काही त्रुटी आढळल्या. त्यावेळी त्यांनी असा वसा घेतला की “माझ्या मुलासारखे असे अनेक मुलं असतील त्या मुलांसाठी आपल्याला कार्य करायचे आहे.” आणि त्यांनी त्या पद्धतीचे शिक्षण स्वतः घेतले.

आज या संस्थेमध्ये 30 मुले 30 मुली आहेत. साधारण वयोगट 5 ते 40 असा आहे. या संकुलामध्ये अतिशय स्वच्छता पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांचा टापटीपपणा, शिस्त पहायला मिळाली. या मुलांना शिकवण्यासाठी खास शिक्षकांची नेमणूक केलेली आहे.

या मुलांना आंघोळ घालण्यासाठी, नाष्टा भरवण्यासाठी औषध देण्यासाठी वेगवेगळे शिक्षक, मावशी, सेविका आहेत. इथे मुलांच्या चहापाण्यापासून ते रात्री जेवणापर्यंत सगळी सोय निवासी संकुलात स्वच्छता राखून केली जाते. मुलांना नैसर्गिक प्रातःविधीची सवय होण्यासाठी त्यांना हल्ली ते डायपर वापरत नसून दर एकेक तासाने त्यांना बाथरूम साठी पाठवले जाते. ही माहिती माननीय संस्थापकांनी तिथे दिली. मुलांना अनेक उत्तम सवयी यांनी लावलेल्या आहेत. उदाहरणार्थ ओळीत बसवणे. आलेल्या पाहुण्यांच्या सन्मानार्थ स्वागत गीताची तयारी.

येथील मुलांना व्यवसाय शिक्षणही दिले जाते. मेणबत्या, उदबत्त्या, राखी तयार करणे. अशा प्रकारचे साहित्य बनवण्याचे विविध उपक्रम घेतले जातात. आपल्या मुलाची काळजी, आपल्या मुलाचे ध्येय,अशा अनेक मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे निवासी संकुल स्थापन केले. आणि याला उत्तम प्रतिसाद समाजाकडून मिळत आहे. यांना कोणताही शासनाचा हातभार नाही की कोणत्याही शासकीय व्यक्तीचा पाठिंबा नाही. समाजातीलच काही लोक ज्यांना समाजसेवेची आवड आहे अशी लोक या संकुलला भेट देऊन आर्थिक स्वरूपात किंवा अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये येथे मदत करतात.या मदतीच्या जोरावर या संस्थापकिने मोठी बिल्डिंग बांधलेली आहे,आणि आज त्यांच्या संकुलामध्ये 60 विद्यार्थी आरामात राहत आहेत.

त्यांना विचारले की ह्या मुलांचे आई-बाबांचं काय? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की ‘काही मुलांचे आई-वडील आता अस्तित्वात नाहीत आणि ज्यांचे आहेत त्यांनी ह्या मुलांना येथे सोडले परत इथे ते फिरकत नाहीत. या अशा मुलांना सांभाळण्याचे उत्कृष्ट कार्य वरपे मॅडम व त्यांची टीम करत आहेत. त्यांच्या या कार्याला थोडासा हातभार म्हणून आम्ही काही जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांच्याच सांगण्यानुसार केले. मुलांच्या मनोरंजनासाठी वसुधा मॅडम, सुलक्षा मॅडम, सायली ढेबे, योगेश हरणे यांनी बालगीतांची मेजवानी मुलांना दिली. तसेच रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला.

या संकुलाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘ जुलेखा शेख ‘ निवासी मुलगी दुबईला आंतरराष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जिंकून आली. तिला मेडल, मोबाईल असे गिफ्ट मिळाले. आणि जे आर्थिक स्वरूपात मानधन मिळाले त्याचे सोन्याचे कानातले वरपे मॅडमने तिला बनवून दिले. ते तिच्या कानात घातलेले होते असे आवर्जून तिने हे सांगितले.

अशा या संस्थेला आमच्यातर्फे थोडासा हातभार लागला याचा आम्हाला खूप आनंद झाला. मुलांशी सुसंवाद साधून त्यांच्याशी या गप्पा मारल्या त्या गप्पांमध्ये ही मुलं सहभागी झाली. याचे समाधान वाटले. आणि अशा मुलांना संभाळणाऱ्या वरपे मॅडम आणि त्यांची टीम यांचे खूप खूप कौतुक आहे. या कार्यक्रमासाठी आम्हाला हर्षला मुलाणी,शीतल शर्मा,सुलक्षा देशपांडे, मनीषा सुतार, अलका भवारी, रवी डिंबळे, यांचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे