Breaking
अमरावतीई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

नयनमनोहर

श्रीमती सुलोचना लडवे अमरावती

0 4 8 2 9 7

नयनमनोहर

पूर्व दिशेला उगवतो
भाष्कर सकाळ प्रहरी
दृश्य नयनमनोहर पाहून
हर्षाच्या हृदयी लहरी

सजते अवघी सृष्टी
सोनेरी प्रकाशाने
चराचरात चैतन्य
नांदते दिलखुलासपणे

पक्षांचे थवे आकाशात
जणू निघाले शाळेला
कष्टकरी,कामकरी
पोट भरण्या कामाला

रूप सोनेरी घेवून
वाहती झरे खळखळ
नाद ब्रम्ह श्रवणीय
वाहे पाणी झुळझुळ

वृक्ष,वेली आनंदात
डोलू लागले मोकळे
थंडगार पहाटवारा
शहारते अंग सगळे

वाटे सोन्याचा गोळा
पूर्व दिशेला चमकतो
धरती मनी आनंदली
देखावा हा मनी भरतो

श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे