मराठी पत्रकार संघाच्या वतीने बेल्यात पत्रकार दिन 6 रोजी समारंभ
मराठी पत्रकार संघाच्या वतीने बेल्यात पत्रकार दिन 6 रोजी समारंभ
बेला : येथील मराठी पत्रकार संघाचे वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ६ जानेवारीला पत्रकार दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. उमरेडचे नवनिर्वाचित आमदार संजय मेश्राम अध्यक्षस्थानी राहतील. याशिवाय, मानस उद्योग समूहाचे संचालक सारंग नितीन गडकरी, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप घुमडवार,कार्याध्यक्ष सुभाष वराडे, अप्पर तहसीलदार विकास बिक्कड,जि प सदस्या वंदनाताई बालपांडे, पं. स.सदस्य पुष्कर डांगरे, सरपंच अरुण बालपांडे व ठाणेदार सी.बी.चौहाण प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
यानिमित्त सुप्रसिद्ध कवी तथा अभिनेते किशोर बळी यांचा भन्नाट विनोदी व वऱ्हाडी कार्यक्रम ‘ हास्यबळी डॉट कॉम ‘ हा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर होईल. सोमवार ६ जानेवारीला बेला पोलीस स्टेशन समोरील साई सुंदर हॉलमध्ये सायंकाळी ६ वाजता आयोजित समारंभात विविध क्षेत्रातील निवडक आदर्श व कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित केल्या जाईल. तसेच हुशार, गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या मदत करण्यात येईल.
बेला व परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमासाठी सहपरिवार अवश्य उपस्थित रहावे. असे आवाहन संयोजक तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरज कांबळे, सचिव उत्तम पराते, उपाध्यक्ष राजू चिपडा, कोषाध्यक्ष कैलास साठवणे, सहसचिव संदीप धंदरे,दिनेश गोळघाटे, विनोद डांगरे,रवी पराते, दिलीप माथनकर, दिलीप घीमे, राजेंद्र सूर्यवंशी, नंदकुमार भुजाडे, आशिष सोनटक्के, खुशाल वैद्य, पुंडलिक कामडी, रोशन मेहरकुरे, अमित नवनागे, संजय लामपुसे तुषार मुठाळ, अखिल रोडे व बेला,सीरसी पिपरा येथील समस्त पत्रकारांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.