‘व्यसनमुक्त पहाट २०२५’ उत्साहात संपन्न
जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया
‘व्यसनमुक्त पहाट २०२५’ उत्साहात संपन्न
जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया
गोंदिया : (दि ३): श्री.गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था गोंदिया द्वारा आयोजित व्यसनमुक्त पहाट कार्यक्रम दिनांक ३१ /१२/२०२४ ला श्री गुर्जर क्षत्रीय समाजवाडी ,गोंदिया येथे मोठ्या थाटामाटात व रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमाच्या मेजवानीसह भरगच्च प्रेक्षकांच्या उपस्थित संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.प्रजित नायर जिल्हाधिकारी गोंदिया , मा. परीस देशमुख, पोलीस उपमहानिरीक्षक राजस्थान ,चंद्रभान खंडाईत, उपविभागीय अधिकारी गोंदिया, डॉ .दिशा पडई सहा .धर्मदाय आयुक्त , श्रीमती मीनाक्षी बन्सोड सहा.राज्य कर आयुक्त मा .अनिल देशमुख समाजकल्याण अधिकारी, चित्रपट अभिनेत्री चंद्रलेखा जोशी, विजया बाबर ,डॉ .सुष्टी बहेकार व ममता नंदागवली विमानतळ पोलीस निरीक्षक मुबंई , विजय बहेकार संस्थापक श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्था हे होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थाध्यक्ष विजय बहेकार यांनी करीत व्यसनमुक्त पहाट कार्यक्रम मागील १२ वर्षापासून आयोजित करीत असल्याचे सांगत युवकांना व्यसनमुक्त करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचे सांगितले. नशामुक्त भारत ही खूप मोठी संकल्पना असल्याचे मत मा. प्रजित नायर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी व्यक्त केले. नशामुक्त भारत अभियान राष्ट्र उत्थानासाठी सर्वाधिक आवश्यक असल्याचे परिस देशमुख, पोलीस उपमहारीक्षक जयपूर म्हणाले.
सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक बहारदार व जनजागृतीपर कार्यक्रम सादर करण्यात आले. यात गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळेतील विध्यार्थ्यानी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमात प्रथम पुरस्कार जांभडी दोडके (आदिवासी नृत्य), व्दितीय पुरस्कार शहीद जाम्या तिम्या हाँय . गोरेगाव (जयभीम नृत्य), तर तृतीय पुरस्कार जि.प.पू. मा. शाळा चुटिया( मुले) गोंदिया ,(व्यसनमुक्त दंडार), चतुर्थ पुरस्कार राधाबाई नर्सीग कॉलेज (बंगाली नृत्य) यांना प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात प्रा .सविता बेदरकर , धन्नालाल नागरीकर, डॉ .प्रकाश धोटे ,मुरलीधर माहोरे , भावना कदम ,गजानन फुंडे,एड.ओमप्रकाश मेठी,कैलाश भेलावे , मुन्नालाल यादव ,शामराव बहेकार ,सुशीला बहेकार, रुपाली खांदेकर ,रामकृष्ण चौधरी सह शेकडो नागरीक उपस्थित होते .