0
4
8
2
8
6
जन्मोत्सव
सुवर्णक्षण घेऊनी आला
आला शिलेदार समूहात
जन्मोत्सव रंगात रंगला
रंगला कवी मनामनात
थोरवी राहुलदांची कशी
कशी वर्णावी अल्प शब्दात
कर्तव्यनिष्ठा दिसून येई
येई दादांच्या रोमारोमात
ज्ञानदानाचे पवित्र कार्य
कार्य करता घेतला ध्यास
भाषा सक्षमीकरणासाठी
अहोरात्र केलात प्रयास
हसतमुख प्रसन्नचित्त
प्रसन्नचित्त मधुर वाणी
काटेकोर नियमांचे धनी
आहेत पालक स्वाभिमानी
लाभो आरोग्यमयी जीवन
जीवन सौख्य समृद्धी पूर्ण
अभिष्ट चिंतितो ज्ञानाग्रज
व्हावे इष्ट सकळ संपूर्ण
दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव
=========
0
4
8
2
8
6



