Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील विजेत्यांच्या कविता

मुख्य संपादक राहुल पाटील नागपूर

0 5 1 7 5 8

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗*

*☄विषय : जंगल वाचवू या☄*
*🍂शनिवार : २१/ मार्च /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २१० साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

पशु पक्षी वृक्ष वेली
कीटक मानव सारे
सर्वांना समान हक्क
धरतीची सर्व लेकरे…!!

सर्वात स्वार्थी मानव
हव्यास याचा सुटेना
निसर्ग नियम मोडीतो
चांगले काहीच पटेना…!!

स्वतः च्या घरासाठी
सर्वांचेच घर मोडले
दगडाचे काळीज जणू
याचे वागणे बिघडले…!!

मानवासारखा कोणीच
इतर जीव कृतघ्न नाही
फुले फळे फुकट खाऊन
जंगलतोड करीत राही…!!

कोरोना तर ट्रेलर फक्त
चित्रपट खराखुरा बाकी
कर्माचे फळ जवळ फार
आता तर करावी नेकी..!!

जंगल वाचवू या आता
तरंच राहील तुझा श्वास
अन्नसाखळी तुटली तर
बेभाव मानव हमखास…!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

जंगल वाचवू या , श्वास सुखाने घेऊ।
जीवन धन्य करु ,व्रुक्षास प्राण देऊ।।

वसुंधरा प्रीतीची, आपली ती मावली।
हिरव्या पदराची , देते सदा सावली।।

रंगी पाना फुलांना , बहुरंगी हिरवा।
लुळ्या पांगळ्यांना,मायेचाच गारवा।।

जैव विविधतेनी , पशुप्राणी पाखरे।
संचारी अम्रुताचे ,निर्मळ पाणी झरे।।

वनी हिरवळीच्या , डोकावती किरणे।
कुशीत स्रुष्टिच्या या,वाटे सुखी जगणे।।

गंध पवन सुमनांनी , सदा दरवळते।
रानपाखरांचे गीत,वसंत नभी छेडते।।

शुद्ध हवा आरोग्य,लाभे निवारा अन्न।
व्रुक्ष जगवूनी करु, प्रुथ्वीचे संवर्धन।।

निळे आकाश दिशा , उजळून जाईल।
जगी जीवनीसृष्टी ,आनंदाने गाईल।।

*गोवर्धन तेलंग*
*पांढरकवडा. जि यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

एक तरी झाड लावूया
निसर्ग मित्र होवू या
रक्षण आणि संवर्धन
चला जंगल वाचवू या…//

एक व्यक्ती एक झाड
करूया असा संकल्प
पर्यावरण संतुलनार्थ
नाहीच अन्य विकल्प…//

असेल अमाप वनराई
तरच मुफ्त प्राणवायू
अन्यथा भविष्यकाळी
अकालीच घटेल आयू.. //

फळे, फुले, वनौषधी
हेच तर वनांचे वरदान
भावी पिढीसाठी याचे
आताच ठेवावे भान.. //

जमिनीची धूप रोखणे
वेळेत पाऊस पाडणे
महावृक्षच तर करतात
नैसर्गिक तोल साधणे.. //

हजारो पशू पक्ष्यांसाठी
आसरा ठरतात जंगले
इथेच उभारले मानवाने
सिमेंटचे उंच उंच बंगले..//

जर अशी होत राहील
इथे वनसंपदा नामशेष
तर मानवी विनाशाचा
अध्याय असेल विशेष.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

हिरव्या सावलीला प्राणी आले
पाखरांचे गाणे गुंजत राहिले…

निसर्गाची ही सुंदर किमया
चला सगळे जंगल वाचवू या….

झाडे तोडून मानव रिकामे झाले
नदी नालेही बिना पाण्याचे कोरडे पडले…

एकमेकांना साथ देऊनी मदत करूया
नव्या रोपांना जीवनदान देऊया..

प्रेमाने, मायेन वृक्षारोपण करूया
हिरवळ पुन्हा आपण फुलवूया…

निसर्गाशी नाते घट्ट करूया
प्रेमाने त्याचे रक्षण करून ऋण फेडूया…

सर्वांनी मिळून पर्यावरण सांभाळूया
जंगल वाचवून प्राण्यांचं भविष्य घडवूया….

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

झाडे लावूया झाडे जगवूया,
वसुंधरा हिरवीगार करूया…
वृक्ष आमुचे असे सगे सोबती,
ह्या नात्याला निरंतर जपूया…१

कोरोना देऊन गेली शिकवण,
प्राणवायूची सांगून किंमत…
सृष्टी आमुची जीवन रक्षक
तयांपुढे नतमस्तक हिंमत…२

कंदमुळे फळे फुले आणिक,
मिळे औषधीयुक्त वनस्पती…
सजीवांना जगण्यासाठी नित्य,
आँक्सीजनचा पुरवठा करती…३

वन्य प्राणी पक्ष्यांच्या प्रजाती,
निसर्गात होई त्यांची पूर्णतृप्ती…
*सुधाकरा* *जंगल वाचवू या*
होण्या सफल जीवनी स्वप्नपूर्ती…४

*सुधाकर भगवानजी भुरके*
*आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*जंगल वाचवू या*

निसर्गाचा ढासळता समतोल
आता मात्र आपण सावरू या
पुढे येणारी आपत्ती टाळण्या
चला मिळून पुढाकार घेऊ या

वनराई फुलली तर फुलेल ही
आम्हां सजीवांचे खरे जीवन
जंगल तोड होत राहीली तर
पुढे चालून निश्चित असे मरण

आयुर्वेदिक वनस्पती औषधी
उपलब्ध साठा असे जंगलात
इलाज करी जीर्ण आजारावर
संधी मिळे मानवा जगण्यास

निसर्ग साखळी बिघडली तर
अवघड होईल माणसा जगणे
धाव घेतील हिंस्र पशु प्राणी
शेतात,रस्त्याने कठीण वागणे

नका करूस जंगलतोड आता
सावध ऐकाव्या पुढल्या हाका
पुढील संकट टाळण्यासाठी
जंगल वाचवू या ऐका बरं का?

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य ,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

जंगल फक्त झाडे नाही
आहे पृथ्वीचे जीवन
ठेवी नियंत्रित तापमान
संतुलित पर्यावरण

पक्ष्यांचे किलबिलाट
पशु प्राण्यांची दुनिया
जंगला बिगर अधूरी
आहे सृष्टीची किमया

निस्वार्थी वृत्ती ठेवूनी
गरजा भागवी जंगल
आपण करतो वृक्षतोड
निसर्गाचे होई अमंगल

एकची आता संकल्प
करूया वृक्षारोपण
सेल्फी पुरतं न ठेवता
लेकरा परी करू जतन

हिरवी झाड गोड वारा
यातच भवितव्य खरे
निसर्गाशी घट्ट करू नाते
जंगल वाचवू या मिळून सारे

*कुशल गो डरंगे अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️
*जंगल वाचवू या*

जंगल वाचवू या चला
आळा घालू प्रदूषणाला
पशुपक्ष्यांचे प्राण वाचवू
हरित करुया वसुंधरेला

स्वार्थी हाव मानवाची
वृक्षतोड बेसुमार केली
निसर्गाचा गळा घोटून
जंगले सिमेंटची वाढवली

प्राणवायूची कमतरता
ओझोन थर विरून गेला
कार्बन मोनॉक्साइड वाढून
प्रदूषणाचा राक्षस माजला

ऋतूचक्राचा ताल बिघडला
जीवसृष्टी धोक्यात आली
उन्हाळ्यात पावसाळा आला
पर्यावरणाचा तोल ढळला

जंगली पशू गावात आले
अधिवास त्यांचे नष्ट झाले
उन्हाळ्यात सूर्य लपला
पक्षी,जलचर भांबावले

मानवा जंगले वाचवली
तरच रे तू ही जगशील
पृथ्वीचे नंदनवन होईल
आनंदाचे मळे फुलतील

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎋🔸🎋♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे