
0
6
2
9
0
4
रक्षाबंधन
श्रावण मास मंगल भावन
राखी पोर्णिमा असे पावन
रक्षाबंधनाचा असे हा सण
बहिण करते भावाला औक्षण
आरती ती घेई सजवून
दिप घेई त्यात तेवून
घेई ती भावास ओवाळून
प्रेम भावे धागा घेई बांधून
धागा असे हा विश्वासाचा
बहिणीचे रक्षण करण्याचा
निर्मळतेचा भाव आगळा
चैतन्याने फुले सोहळा
बहिण भावाचे नाते रक्तबंधन
हर्षित होई माझे तनमन
मोगर्याचा सुगंध बहरतो
नात्याचे अलवार स्पंदन
आईसम असे ती बहिण
ममतेची ती ज्योत तेवत
निरपेक्ष प्रेम तीचे असे हे
ओढ फुलत असे या नात्यात
पुरुषोत्तम वि.ठोंबरे
झिंगाबाई टाकळी नागपूर
=========
0
6
2
9
0
4



