0
4
8
2
9
7
स्वप्नवैभव
जीवनात कधी सुखद पहाळी
कधी दुःखद ग्रीष्माच्या झळा
आकाशव्यापी स्वप्नवैभवाने
फुलवावा आयुष्याचा मळा.
आयुष्याचे अगणित रंग
आशेच्या किरणांनी उजळावे
संघर्षाचा करून सामना
जीवन सुखसमृद्ध करावे..
स्वप्नवैभव अंतरंगातील माझे
नित्य वाहो स्फुर्तीचा झरा
सर्वांगसुंदर काव्यरचना बहरावी
गाठावा जिद्दीने ज्ञानाचा किनारा.
स्वप्नवैभव नवनिर्मितीचे माझे
विद्यालंकाराने सर्वाधिक खुलावे
साहित्यांगणी रमून अंतर्मनाने
मनावरील मळभ हटवावे..
स्वार्थ मोह त्यागून रूजावेत
जनमानसात सात्त्विक विचार
भ्रष्टाचाराचा काळाबाजार सारुन
निवारावा जीवनातील अंधकार.
सुजाता सोनवणे
सिलवासा दादरा नगर हवेली
==========
0
4
8
2
9
7



