Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरपरीक्षण लेखविदर्भसाहित्यगंध

लक्षात ठेवा…. ‘आमच्याशिवाय तुम्ही शून्य आहात’..!!

सौ. संगीता मेश्राम भिलगांव जि.नागपूर

0 4 8 2 8 6

लक्षात ठेवा…. ‘आमच्याशिवाय तुम्ही शून्य आहात’..!!

तशी ‘ती’ तिची आवड निवड जवळपास विसरून गेली. पण आज तिने तिच्या आवडीची भाजी केली , तर नवरा कुरकूरलाच. मुलगा म्हणाला, ‘जगात लोक मुलांच्या आवडीचं करतात आणि तू तुझ्या आवडीची भाजी बनवलीस’. मला नाही खायचं. मला दुसरं काही तरी बनवून दे. कुटुंबाचा जमाखर्च सांभाळताना नवरा म्हणतो, तुला काय कळणार? तू काय घरात बसून खातेस. ती अर्थार्जन करत नाही म्हणून त्यांच्या लेखी तीचं अस्तित्व शून्य..?
मुलगा म्हणतो मी कितीही खर्च करेन तुला काय?? तू कुठे पैसे कमवायला जातेस?

आईला ओरडून बोलणं हा तिचा अपमान आहे हे त्याला कधी वाटलेच नाही. तू गप्प बस जरा.असं बोलून मोकळे होतात हे मुलं. नविन तंत्रज्ञानाशी जूळवून घेतांना अडचण आली तर तुला समजत नाही तर राहू दे. नको वापरत जाऊ ते असं अगदी सहज बोलून जातात. बाळा तुला उदरात वाढवताना पोटावर पडलेले ओरखडे ती सहज विसरते.पण तुझे हे सहज बोलणे मनावर कायमचे ओरखडे कोरुन ठेवतात. ‘महिला दिवस’ आला की मात्र तोंडभरून शुभेच्छा दिल्या जातात. आम्हाला माहीत आहे.आमच्याशिवाय तुम्ही शून्य आहात. तरीही सर्व मनात साठवून हसत जगण्याला सामोरे जाते. पण हीच तर स्त्रीची शक्ती, सहनशीलता आहे.
ज्या दिवशी तुला आईच्या अस्तित्वाची जाणीव होईल. तिलाही आवडीनिवडी आहेत. तिचाही अपमान होतो ही जाणीव होईल, तो दिवस त्या माऊलीसाठी ‘महिला दिन’ असेल.

जोडीदार ज्या दिवशी तीला गृहीत न धरता खऱ्या अर्थाने अर्धांगिनी समजून तिला सन्मान देईल. त्याच्या देहाची गरझ भागवतांना तिची मर्जी विचारात घेईल तो दिवस तिचा महिला दिन. तुम्ही कितीही दिन साजरे केले. बाहेर स्तुतीसुमने उधळली, पण रोजच्या जगण्यात ती अपमानित होत राहिली तर मात्र ती महिला ‘दीन’.

सौ. संगीता मेश्राम
भिलगांव जि.नागपूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे