आनंदाचे आभारपुष्प; राजश्री ढाकणे
???? *आनंदाचे आभार पुष्प..* ????
*”गवताची पात आहे*
*सुंदर नि छान छान*
*टाकले माझ्या पदरी*
*तिने आनंदाचं दान..!”*
???? सर्वांना सस्नेह वंदन????
काल दिनांक ०५-११-२०२४ रोजी “मंगळवारीय बालकाव्य स्पर्धा”घेण्यात आली, विषय होता -“गवताची पात” विषय वाचल्याबरोबर कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज लिखित “गवताचं पातं ” ही कविता वर्गात शिकवलेली विद्यार्थ्यांनी साभिनय गायन केलेली सर्व चित्र क्षणातच डोळ्यासमोर तरळून गेले…अवघ्या निसर्गाचं दर्शन घडवणारी ही कविता आहे… जणूकाही अवघा निसर्ग धावून आला आणि माझं बालकाव्य पूर्ण केलं… कारण मी तर त्या बालपणातील अनुभवलेल्या गवताच्या पातीवर सर्वत्र सैर करत होते…एक एक दृश्य येऊन माझ्याशी खेळत होते, बागडत होते, लेखणीभोवती पिंगा घालत होते…अवघा निसर्ग मला दाहीदिशांनी पुकारत होता की…. आम्हांलाही तुझ्या बालकाव्यात येऊ दे… पण मोजकेच दृश्य लेखणीने स्वीकारले… बाकीच्यांचा नंबर पुढच्या वेळी नक्की लागेल असेही लेखणीने निसर्गाला आश्वासन दिले…!…आणि सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आदरणीय राहुल दादा आणि परीक्षक टीमला माझी “गवताची पात ” कविता अतिशय भावली असून त्यांनी चक्क सर्वोत्कृष्ट नंबर १चे स्थान देऊन गौरविले…!
शिलेदार परिवाराला मी नेहमीच ‘माझं माहेर’ समजते;कारण इथेच माझ्या लेखणीचा जन्म 2019 ला झाला… माझे सर्व साहित्यिक अपत्ये इथेच लहानाची मोठी होत आहेत… सर्वात आधी चारोळी, मग कविता, नंतर हायकू, त्रिवेणी काव्य आणि आता बालकाव्य… जे आणखी बाल्यावस्थेतच आहे… पण काय सांगू त्याचेही इथे खूप कोडकौतुक करतात सर्वजण… आणि माझाही जरा जास्तच जीव आहे याच्यात… सर्व साहित्यिक प्रकारापेक्षा मला “बालकाव्य ” जास्त आवडते… कारण इथे पुन्हा पुन्हा बालपण अनुभवायला मिळते… बालपणीचा तो आनंद फक्त बालकाव्यातच मिळतो…!…मला एका कवितेच्या ओळी आठवल्या त्या आपल्यासाठी सांगते…
*”जेव्हा आम्ही लहान होतो..**
*दिसायलाही छान होतो*
*आईचा तर प्राण होतो*
*आता आम्ही लहान नाही*
*छान तर मुळीच नाही*
*कारण आम्ही मोठे झालो…!”*
सांगायचं तात्पर्य असं की, बालपणात जे सुख आनंद आहे तो मोठेपणी शोधूनही सापडत नाही…अगदी तसेच जो आनंद “बालकाव्यात “आहे तो इतर साहित्यिक प्रकारात नाही हा माझा अनुभव आहे… प्रत्येकाचा वेगळा असू शकतो… बालकाव्यात बालकांच्या पातळीवर जाऊनच विचार करावा लागतो… तसेच शब्द त्याठिकाणी अपेक्षित असतात असं मला तरी वाटतं… असं झालं तर बालकाव्य वाचतानाच मन गाऊ लागतं… नाचू लागतं… सर्व बालकृती आपोआप घडून जातात… जशा काल आपल्या वसुधा ताईंनी किती गोड आवाजात गायन केले…!… (सहज मनातले भाव प्रकट केले…)*
???? *शिलेदार परिवारात – रोजच विविध स्पर्धा आयोजित करून सर्वांना गौरविले जाते…!…रोज प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला जातो… अगदी नि:शुल्क… निःस्वार्थपणे मराठी कवी /कवयित्री घडवण्याचं कार्य इथे केलं जातं…”शिलेदार समूह” म्हणजे एक चालते, बोलते,हसते, खेळते, आनंददायी साहित्यिक विद्यापीठ आहे असे मी आवर्जून नमूद करू इच्छिते…!!!…सर्व प्रशासक /सहप्रशासक /परीक्षक आणि मुख्य आयोजक यांच्या अहोरात्र कष्टाची कल्पना करून मी सदैव ऋणी असेल..
आणि म्हणूनच मी सर्व परिवाराचे ऋणयुक्त आभार व्यक्त करू इच्छिते …!!!
” मंगळवारीय बालकाव्य “स्पर्धेत माझ्या “गवताची पात ” बालकाव्याची सर्वोत्कृष्ट स्थानी निवड करून लेखणीला सन्मानित केल्याबद्दल मी शिलेदार परिवाराचे सर्वेसर्वा मुख्य संस्थापक अध्यक्ष.. आदर्श प्रशासक… विविध स्पर्धेचे मुख्य आयोजक… मराठी भाषेला आयुष्यात दर्जा मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असणारे… शिलेदार विद्यापीठाचे कुलगुरू… देवांश… ध्येयवेडे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय श्री राहुलदादा पाटील, तुमच्या कार्यात खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी आणि संस्थेच्या सचिव पल्लवीताई पाटील, शिलेदार परिवाराच्या मुख्य प्रशासक… मुख्य परीक्षक… संपादक संवेदनशील व्यक्तिमत्व प्रिय सौ. सविता पाटील ठाकरे, मुख्य प्रशासक…परीक्षक.. संकलक… प्रेमळ व्यक्तिमत्व प्रिय सौ. वैशालीताई अंड्रस्कर, त्रिवेणी काव्याच्या मुख्य मार्गदर्शक.. परीक्षक प्रिय वृंदाताई आणि सर्व सन्माननीय… आदरणीय प्रशासक, सहप्रशासक, परीक्षक.. संकलक… मार्गदर्शक… प्रिय सौ. स्वातीताई, प्रिय सुधाताई, प्रिय प्रतिमाताई,प्रिय तारकाताई,प्रिय शर्मिलाताई,आदरणीय श्री विष्णू दादा, संग्राम दादा, अरविंद दादा, अशोक दादा, विकास दादा, हंसराज दादा सर्व शिलेदार प्रशासकीय टीमचे मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद… आजच्या स्पर्धेतील सर्व सहभागी आणि विजेत्या सन्माननीय दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन…!!!.
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा
सदस्या – मराठीचे शिलेदार समूह



