0
4
8
2
8
6
नजाकत
विरह प्रेमाचा अथांग सागरी ,
घेऊन चालली घागर डोईवरी ,
नजाकत तिच्या चालण्याची ,
शोभून दिसते कमरेवरी….1
विरह प्रेमाचा अथांग सागरी ,
भर पडली नयनाश्रुंची ,
लाल नाजूक कोमल कळी ,
विरह गाणं गुणगुणतंय गळी …2
आठवून प्रेमाचा सागर ,
बोलण्यात अवतरला सार ,
नजाकत तिच्या बोलण्याची ,
हृदयाला टोचते फार …3
बोलण्याने मोहवते सर्वांना ,
नि बसते सर्वांच्या मनी ,
आठवून आता बेजार करते ,
तिची मोहक वाणी नि गाणी …4
नजाकत नि फक्त नजाकत ,
आभूषण आहे हे स्त्रियांचं ,
देवांना सुद्धा प्रेमात पाडून,
सामर्थ्य धरतीवर आणण्याचं …5
माधुरी हेमराज लांजेवार
ता.नागपूर जि.नागपूर
==========
0
4
8
2
8
6



