0
4
8
2
8
4
शिक्षणव्रती
पुण्याच्या भिडेवाड्यात लावूनिया पणती
वसा हाती घेती सावित्री फुले शिक्षणव्रत्ती
आज लाखो पणत्यांचा प्रकाश पडलाय
सारा अंधारच जणू उजाळून निघालाय
सदैव मनी ध्यास धरून केले महान कार्य
जागृत केले स्त्रीत्वाचे आत्मबल मनोधैर्य
सावित्री तू केले जोखडातून स्त्री बंधमुक्त
ज्ञानामृत प्राशन करतात आता मनसोक्त
स्त्रीशिक्षण योगदाने झालीस स्त्रीउद्धारक
तव् नामे उभारली विद्यापीठ अन् स्मारक
स्त्रीशिक्षणाची ज्योत पेटवून नवक्रांती केली
आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्री झाली
तव् कार्याची प्रेरणा भावी पिढीस मिळावी
याजसाठी तर वेगवेगळी उपक्रमे राबवावी
सावित्रीबाई फुले तुझाच हा शुभ जन्मदिन
साजरा होतोय सर्वत्र, महिला शिक्षण दिन
बी एस गायकवाड
पालम,परभणी
=========
0
4
8
2
8
4



