
0
4
0
9
0
3
पोरी जरा जपून
जाऊ नको एकटी
अशी नटूनथटून
पुढचे पाऊल टाक
पोरी जरा जपून.
विश्वास नको टाकू
असा एकदम कुणावर
सावजाला शोधताहेत
क्रूर जंगली जनावर.
तुझेच तुला आता
करावे लागणार रक्षण
सुरक्षेसाठी आपल्या
लढावे लागेल रण.
कोण दादा कोण भाऊ
फसवतील गोड बोलून
प्रसंगावधान ठेव राखून
वेळ येत नाही सांगून.
गाफील नको राहू
दबा धरून आहेत चोर
नको भिक घालू
असतात ती मुजोर.
दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
0
4
0
9
0
3





