0
4
8
2
3
8
कविता आणि मी
कविता आणि मी जणू
आहोत सख्ख्या बहिणी
कधी होतात रूसवे फुगवे
कधी परस्परास मोहिनी
कवितेशिवाय मला
करमेना एक क्षण
सुखदुःखाची साथी
जपते ती माझे मन
देते मला स्फुर्ती सदा
अन्यायाविरूद्ध लढण्याची
वाचता तिला बदलती कैक
करती होळी कुविचारांची
तिच्यामुळे साधते जवळीक
निसर्गाच्या चमत्काराशी
तिच भरते शब्दांचा हुंकार
जाणिव होते हृदयाशी
सजवते मी तिला नित्य
अलंकार नी रूपकांनी
तिच्यामुळे लौकिक मला
संगत तिची सद्वर्तनी
कवितेमुळे आहे जीवनात
आनंद आणि सौख्याचे क्षण
वेळ कसा जातो निघून
वेचताना शब्दांचे सुवर्णकण
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
सदस्या,मराठीचे शिलेदार समूह
0
4
8
2
3
8



