Breaking
कवितानागपूरमराठवाडासाहित्यगंध

सत्यमेव जयते; संग्राम कुमठेकर

लातूर

0 4 8 2 9 0

सत्यमेव जयते

संदर्भ देऊन मनुस्मृतीचा
साध्य काय अजून करायचं
कलंक हा जाती धर्माचा
पुसून कधी कुणी काढायचं

राष्ट्रीय बीदवाक्य विसरून
मानवी मूल्ये कशी रूजतील
स्वार्थात नैतिकता घसरून
सत्य बोलाय लोकं बुजतील

अशोक स्तंभ तो दिशादर्शक
सत्यमेव जयते शोभते खरे
अराजकता पाहून रे धार्मिक
काळजाला पडतील ना चरे

अग्निपरीक्षेत विजय सत्याचा
बंगला पत्त्याचा रे कोसळतो
बाजार मांडूनच बेगडी प्रेमाचा
दुधातही युरिया तो मिसळतो

सत्यमेव जयते राष्ट्र आरसा
भक्कम संविधानाची निर्मिती
राष्ट्रहिताचा चालवून वारसा
वैज्ञानिक बनवावी राजनीती

थोतांड रे प्रथा नि परपरांना
कायमची द्यावी रे मूठमाती
सत्यम् शिवम् सुंदरम् यांना
सांगून पेटवाव्या ज्ञानज्योती

संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे