Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

नांद येथे सामुदायिक प्रार्थना मंदिर उद्घाटन सोहळा थाटात

लोक सहभागातून केली सभागृहाची उभारणी

0 4 8 2 8 6

नांद येथे सामुदायिक प्रार्थना मंदिर उद्घाटन सोहळा थाटात

नित्यनेमाने होणार सामुदायिक प्रार्थना व हरीपाठ

लोक सहभागातून केली सभागृहाची उभारणी

प्रतिनिधी: नांद/भिवापूर

बिनधास्त न्यूज नेटवर्क

भिवापूर/ नांद: नांद हे भिवापूर तालुक्यातील सर्वात मोठे दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे.या गावात मागील अकरा वर्षांपासून एक तरूण आपली सेवा संगीत शिक्षक म्हणून विना पगारी नियुक्त झाला व त्या संगीत शिक्षक ला या गावात तरूणांना आध्यात्मिक करण्यासाठी तो धडपडत होता.या शिक्षकने अनेक गायक, तबला वादक, हार्मोनियम वादक,बासरी वादक तरून तयार करून त्यांना योग्य ते निस्वार्थ भावनेने शिक्षण दिले.परीनामता बहुतांश गावात संगीत शिक्षक म्हणून तो काम करायचा यासोबतच तो किर्तनकार होता त्यामुळे तो अधीकच प्रचलीत झाला.पण दिवसेंदिवस शिक्षण घेणा-यांची संख्या असल्याने आता शिक्षणासाठी जागा शोधत गुरुदेव सेवा मंडळाची जागा शोधत त्यांनी दहा वर्षांत आज एक भलेमोठे प्रार्थना मंदिर उभे केले.

यात गावातील लोकवर्गणीतून ते उभारणी केली अशा शिक्षकांचे नाव महाराज सुरेश तळवलकर आहे हा वर्धा जिल्ह्यातील वायगाव (निपानी) गावातील रहिवासी आहे.गरीब घरातील होतकरू असा स्वभाव मीळेल तीथ खायचे व नांदेडमध्ये वास्तव्य केले व आज त्यांच्या हातुन अनेक तरुणांनी आध्यात्मिक झाले व मार्गी लागले.यांचे कौतुक केले तेवढं कमीच आहे.

उद्घाटक मानवता विचार राष्ट्रीय प्रबोधनकार तुकारामदास घोडे महाराज..16/01/2026 ला नांद येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लावलेल्या प्रणालीनुसार सर्व धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय, लोक सुधारण्याचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना. या ओवीला अनुसरून या गावांमध्ये आमचे सखा मित्र ह भ प सुरेश तरवटकर महाराज यांनी या गावांमध्ये अकरा वर्षापासून जिल्हा परिषद शाळेमध्ये गायन शिक्षक म्हणून कार्यरत असताना येथे अनेक मुलांना सामुदायिक प्रार्थना मधून गायन तबला आणि अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन करून तब्बल 40 मुलं घडविलेले आहे.

त्यांच्या पुढाकारातून गावातील गरीब, श्रीमंत, अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य, आणि संपूर्ण स्वयंसेवक सर्वधर्मसमभाव, गावातील अनेक लोकांच्या व वाढई साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. गावामध्ये सुंदर असं सामुदायिक प्रार्थना मंदिर बांधण्यात आले आहे. त्यांचे कौतुक कराव तेवढे कमी शब्द अपुरे पडतात. मंदिर उद्घाटन व व अध्यक्ष भाषणामध्ये बोलताना घोडे महाराज म्हणाले हे माझे खरे कर्तव्यशील मित्र आहे. सर्व विद्यार्थी गावकऱ्यांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू चा महापूर पाहिला तेव्हा खऱ्या अर्थाने सुरेश महाराजांनी कशा पद्धतीमध्ये आपला स्वभाव आचरण ठेवले असेल हे सगळं दिसून येतात.

एका आईने जन्म दिला, तर त्या गावातील दुसऱ्या आईने अकरा वर्ष त्यांचं भाडं घेतलं नाही. तिसऱ्या आईने अकरा वर्षापासून जेवू घातल, आणि गावात अनेक लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली सहकार्य केलं दान दिलं असे त्या ठिकाणी बोलताना घोडे महाराजांनी स्वतः डोळ्यांनी पहाले व ऐकले. गावात वारकरी दिंडी सोहळा, काढून गाव दुमदुमले, सामुदायिक मानवता प्रार्थना मंदिर तयार करण्यासाठी गावतील सर्व लोकांनी मोलाचे सहकार्य केले असून उद्धटन सोहळा पार पाडण्यात ग्रामनाथ गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व् सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गण गावतील व परिसरातील सर्व भजन मंडळी सर्व मुस्लिम,बौद्ध, शीख,जैन,हिंदू, आदिवासी अश्या सर्व धर्माच्या लोकांनी तसेच सचिन शिखरे भागवतकार प्रवीण मोहिजे महाराज एका जागी येऊन हा कार्यक्रम यशस्वी करून एक आदर्श प्रस्थापित केला आहे.

याचे सर्वत्र् कौतुक केल्या जात आहे. गुरुजी सुरेश तरवटकर महाराजांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता, आईने खूप मोठ्या प्रमाणात आपल्या मुलाचं कौतुक केलं, संपूर्ण महिला मंडळी, पुरुष मंडळी कार्य करणाऱ्यांचा सत्कार सोहळा झाला सर्व धर्माच्या प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना करून संपूर्ण मंडळींचे मनापासून आभार मानण्यात आले, नंतर महाप्रसाद, सायंकाळी भजन व राष्ट्रवंदना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे