Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमुंबई

अलिबागच्या पहिल्या नवरात्र उत्सव मंडळ, गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीची घटस्थापना संपन्न

तुषार थळे, अलिबाग, प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

अलिबागच्या पहिल्या नवरात्र उत्सव मंडळ, गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्या देवीची घटस्थापना संपन्न

तुषार थळे, अलिबाग, प्रतिनिधी

अलिबाग: शहरातील बाजारपेठेच्या महाजन हॉलमध्ये ३ ऑक्टोबर २०२४ रोजी घटस्थापना विधी संपन्न झाला. या मंडळाची स्थापना अलिबागमधील गुजराती समाजाच्या पुढाकाराने झाली असून या वर्षी मंडळाचे ६४व वर्ष आहे. मंडळाचे अध्यक्ष मयूर डाबी (बाडा) असून मंडळाच्या समिती सदस्यांमध्ये सुरेश जैन, राजेश छेडा, अंकित भानुशाली, नीरज भानुशाली, सैय्यम संघवी आणि प्रथमेश गांधी यांचा समावेश आहे. घटस्थापनेची पूजा बाजारपेठेतील जितेंद्र नरेंद्र मेहता आणि कृपा जितेंद्र मेहता या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली.

दरवर्षी शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील या मंडळाच्या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित राहतात. त्या नियमितपणे या उत्सवात सहभागी होऊन, स्थानिक गुजराती समाजासोबत गरबा खेळण्याचा आनंद घेतात. याशिवाय, अलिबागचे माजी नगराध्यक्ष श्री. प्रशांत नाईक, माजी नगरसेवक अनिल चोपडा देखील या सोहळ्याला हजेरी लावतात. अलिबागमधील गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्या स्थापनेमुळे स्थानिक समाजात उत्साह संचारला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे