‘आम्ही युवा’ तर्फे भारत परिक्रमा पूर्ण केलेल्या डॉ अंशुजा किंमतकर व लक्ष्मी माठारे यांचे जंगी स्वागत
शहर प्रतिनिधी, नागपूर
‘आम्ही युवा’ तर्फे भारत परिक्रमा पूर्ण केलेल्या डॉ अंशुजा किंमतकर व लक्ष्मी माठारे यांचे जंगी स्वागत
शहर प्रतिनिधी, नागपूर
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि २३ डिसे.) राज्याच्या उपराजधानीत भारत परिक्रमा ‘भारत के रंग, नारी के संग’ ही यशस्वी मोहीम पूर्ण करून नागपूर येथे परतलेल्या शहरातील प्रसिध्द महिला डॉ. अंशुजा किंमतकर व समाजसेविका श्रीमती लक्ष्मी माठारे यांचे ‘आम्ही युवा’ संस्थेतर्फे आज (दि २३) शहरातील प्रसिद्ध वास्तू असलेल्या ‘झिरो माईल’ येथे जंगी स्वागत करण्यात आले.
या दोन्ही धाडसी महिलांनी कार चालवून ही परिक्रमा पूर्ण केली. हा त्यांचा प्रवास नागपूरहून दि १ आॉक्टोबर २०२५ रोजी सुरू झाला होता, त्यांनी २७ राज्य व ६ केंद्रशासित प्रदेशात भेट देऊन आज दि २३ डिसेंबर २०२५ रोजी ही प्रवास यात्रा संपवली. त्या निमित्ताने आम्ही युवा च्या कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार व सन्मान केला.
याप्रसंगी आम्ही युवातर्फे लेखक व ज्येष्ठ पत्रकार शामभाऊ पेठकर, राजेश टिकले, शुषमा ओझा, प्रणाली राऊत, क्षितीज इंगळे, चेतन कवळते, योगेश धनकासार, रोशन माथुरकर, किशोर धंदरे, आनंद डबली, डॉ. आशिष उजवणे यांच्यासह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



