0
4
8
2
9
0
भिजकी वही
विठू तुझ्या भेटीची
लागलीय जिवा आस
मुखी तुझाच गजर
तुझ्या भक्तीचाच ध्यास
दिंडी पताका घेऊन
पायी निघाला वारकरी
आषाढीची वारी.. वाटतं
करावी एकदा तरी
अनुभवावा वाटतोय
टाळ मृदुंगाचा गजर
तुझ्याच नामस्मरणात
सरावा हर प्रहर
डोळा भरून पाहावं
वाटे..विठू तुझं रे गावं
अनुभवावा वाटतो
तुकोबाचा भक्ती भाव
इंद्रायणीच्या काठीवाटे
जरा शांत.. निवांत बसावे
भिजकी वही तुकोबाची..
तरंगली तिला डोळ्यांनी पाहावे.
इंदू मुडे
ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपूर
============
0
4
8
2
9
0



