शासकीय विद्यानिकेतनमध्ये अभिनव उपक्रमांची कार्यशाळा
वसुधा नाईक, प्रतिनिधी

शासकीय विद्यानिकेतनमध्ये अभिनव उपक्रमांची कार्यशाळा
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मिळाली व्यासपीठाची दिशा
वसुधा नाईक, प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
छत्रपती संभाजीनगर: शासकीय विद्यानिकेतन प्रशालेत शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या छात्रसेवाकाल अंतर्गत विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय विद्यानिकेतनच्या कुलप्रमुख श्रीमती सोनवणे तर प्रमुख वक्त्या गटप्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.पद्मा जाधव उपस्थित होत्या.प्रमुख उपस्थिती प्रा.नंदवणे आणि मा.श्री.चरपेलवार यांची लाभली.
याप्रसंगी शिक्षकवृंद,प्रशिक्षणार्थी छात्र-अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी आकर्षक व आशयसंपन्न भित्तिचित्रे आणि भेटकार्ड तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविले.तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत,गीत व विविध सादरीकरणांतून आपल्या कलागुणांना वाव दिला.
प्रशिक्षणार्थी छात्र-अध्यापक आरबाज शेख यांनी मनोगत व्यक्त केले.प्रमुख वक्त्या प्रा.डॉ.पद्मा जाधव यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता सर्जनशील उपक्रमांतून शिकण्याचा अनुभव समृद्ध करावा असे प्रतिपादन केले.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण अधिक प्रभावीपणे विकसित होतात असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात रंजित उबाळे यांच्या प्रास्ताविकाने झाली.तर मान्यवरांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. सूत्रसंचालन कार्तिक येवले व सत्यम गुळवे यांनी केले तर जय सोनवणे यांनी आभार मानले.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षणार्थी छात्र-अध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.



