“आभाराची बात; सर्वांना जोडते मायेचे हात”; स्वाती तोंडे पाटील
“आभाराची बात; सर्वांना जोडते मायेचे हात”; स्वाती तोंडे पाटील
शिलेदार समूह सर्वांना
लावतो लेखनाचा लळा….
प्रत्येकांच्या काव्यांचा सतत
फुलवत ठेवतो सुंदर मळा..
खरे तर खुप दिवसांची ही मनात इच्छा होतीच.पण कधी वेळ नसे,कधी तब्बेत,कधी काम,कधी पाहुण्यांची ये जा…..अशा अनंत अडचणी.अलीकडे पिलांनी केलेलं एवढं समृद्ध लेखनही वाचता येत नाही की, कौतुकाचा शिडकावही राहूनच जातो.मग केव्हातरी संधी मिळताच एखाद्या अभिप्रायाचे करते तुषार सिंचन.घेतात सगळी पिल्लं समजून.
मात्र बाळांनो….
“घार फिरे आकाशी,
तिची नजर बाळांपाशी”
हे चालू असतं बरं का..!
तर आज ‘मनीचे लग्न’ खुप खुप थाटामाटात लावले सर्व भावंडांनी. मनीच्या मोठ्या दादाने( राहूल) तर केवढ्या थाटात बोकादाजींचा कान उपटून ( कानपिळा). आपले भावाचे कर्तव्य बजावलेच. इतर सर्वच भाऊ बहिणींनीही थाटात मांडवातून मिरविलेले पाहून सर्वजण आनंदात नाहून निघाले.हिच तर खरी या समुहाची खुप मोठी ताकत आहे.( सर्वांची एकी) अशा एकीनेच कोणत्याही गोष्टी समृद्धीकडे जातात.एकी रामराज्य आणते.
यापेक्षाही मी आपणा सर्वांचे लक्ष आणखी एका गोष्टीकडे वेधू इच्छिते.आपण सर्वजणच नेहमी लेखनाचे सर्व ग्रुप खुप चलाखीने, उत्सुकतेने पाहतो,लिहितो.पण ग्रुप नंबर १५ बाबत मला थोडी जागृती करावीशी वाटते ( अर्थात तुम्हाला सर्व ज्ञात आहेच) मला तोही ग्रुप विविधतेने नटलेला वाटतो.त्यामध्ये अशोक लांडगे सर किती जागृतपणे विविध ज्ञानांची दालन शुभ प्रहरी सर्वांसाठी खुली करत असतात. त्यातील छोट्याच पण संस्कारांचा अद्भुत खजिना असलेल्या बोधकथा, विविध शालेय उपक्रम,शालेय बातम्या,देशविदेशातील घडामोडी, साप्ताहिक शब्दकोडी, आणि विशेष म्हणजे रोज नियमित सूर्य उगवल्याप्रमाणे आ.ठाकरे सर( सविता पाटील) आपले विज्ञानाचे दालन खुले करतातच खुप अलौकिक ज्ञानाने समृद्ध करणारा खजिनाच असतो त्यामध्ये.ठाकरे सरांचे( जावयांचे) खुप कौतुक वाटते.पण त्याकडेही जाताजाता आपण डोकावत जाऊ यात का? या इतर सर्व ग्रुप एवढाच तो एकटा ग्रुपही गर्भश्रीमंत आहे असे मला वाटते.
आणि हे सर्व सातत्याने पुरविणारे राहुल बाळराजे,ठाकरे सर,लांडगे सर व सर्व सहकाऱ्यांना मी मनस्वी सर्वांच्या वतीने खुप खुप धन्यवाद देते. तसेच मनीच्या लग्नाला सर्वजणच कमेंटरूपी अक्षदा घेऊन हजर राहून प्रेरणा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते. आणि हा शिलेदार सर्वच बाबतीत असाच नाती सांधणारा, हृदयी मायेचे पुल बांधणारा ज्ञानश्रीमंत होवो याच सदिच्छा व्यक्त करून थांबते.
शिलेदार ग्रुपमध्ये
सहभागी व्हावे…
सर्वांनीच चढाओढीने
ज्ञानश्रीमंत बनावे…
सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम
इंदापूर पुणे
सदस्या मराठीचे शिलेदार समूह



