Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितामराठवाडासाहित्यगंध

स्वप्नांचा गणेश”

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर

0 4 8 2 9 4

स्वप्नांचा गणेश”

चि गणेशची जिद्द, चिकाटी, माणुसकीचा झरा.नविन नविन शोध, प्रत्येक गोष्टीचे प्रात्यक्षिके करून पाहतो.नविन नविन विद्यापीठांतील माहिती घरी येऊन आम्हाला सांगतो.सतत हसत खेळत असतो आणि हेच वय आहे शोध घेण्याचे म्हणतो.

ओठांवर हसू, डोळ्यांत प्रकाश,
पावलांनी जिंकली काळोखाची पराभूत वाट,
स्वप्नांनी उंच भरारी घेतली,
मनाशी ठरवलं — “मी थांबायचं नाही आता.”

पाठीशी आशीर्वादांचे हात होते,
आई-बाबांच्या नजरेतले विश्वास होते,
शब्द नव्हते, पण नजरा बोलल्या,
“तू चाल पुढं, आम्ही आहोतच तुला घेऊन चालायला.”

काळा सुट, पांढरा शर्ट — नुसता पोशाख नाही,
तो मेहनतीचा सन्मान आहे,
त्या घड्याळात वेळ नव्हे —
तर त्याच्या प्रत्येक स्वप्नांची कहाणी आहे.

आज घर साजरं आहे, मन भरून आलंय,
सजावटीत एक नवीन सुरुवात बोलतेय,
पायरीवर उभा आहे ‘तो’ गणेश,
पण नुसता उभा नाही — उभा आहे एक अभिमानासोबत!

अशी असते काही मुलांची वाट,
शब्द कमी पडतात, पण डोळे पाणावतात…
कारण त्या पावलांमागे असतो संघर्ष,
आणि त्या चेहऱ्यावर असतो यशाचा ओलावा…

गणेश — तू चालत राहा, आम्ही तुझ्यासोबत आहोत…
तुझ्या प्रत्येक यशात आमचं एक स्वप्न साकारतं आहे.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे