Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

मृत्यू

कुसुमलता दिलीप वाकडे उमरेड रोड, नागपूर

0 5 4 7 7 9

मृत्यू

जगलो कुटुंबासाठी दिनरात्र
तिळ तिळ मात्र जळत गेलो
न सुखाची कधी अपेक्षा केली
कष्टाकरीता राबत मरत गेलो !1!

एकेदिनी खरोखरच मरण आले
सर्वाचे फोन खणखणू लागले
झाला गलबला नातेवाईकाचा
वरवर का होईना कुणीतरी रडले!2!

आंघोळीसाठी काढताच बाहेर
सर्वांना लवकर प्रेत नेण्याची घाई
कुणी करू लागले विनवणी
कुणी म्हणाले यायची आहे ताई !3!

पांढऱ्या कापडात दिले ओढून
तिरडीवर ठेवण्याची लगबग
माझ्याच प्रेतासमोर कुणी वाद्य
तर कुणी फटाके गेले फोडत!4!

दोन पावलं सोबत चालायला नव्हते
ते आज मला खांदा देत होते
पाठीमागून करणारे तिरस्कार
स्तुती शब्द सुमने वाहत होते!5!

जळायचं राहू नये म्हणून जे अंग
ते ही लाकडानं झाकून दिले
पाठमोरे झाले मुले सर्व आपले
मी मात्र तीळ तीळ जळत गेले !6!

कुसुमलता दिलीप वाकडे
उमरेड रोड, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 7 7 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे