Breaking
ई-पेपरकवितापरभणीमराठवाडासाहित्यगंध

पेपरफुटी

मनोज परसराम शिंदे ता पालम जिल्हा परभणी

0 6 0 4 9 7

पेपरफुटी

चुलीवरच्या भाकरीत ज्याचे, आईने स्वप्न भाजले,
बापाच्या घामाच्या थेंबांनी, त्याचे पुस्तक भिजले;
दिवा विझू नये म्हणून तो, रात्री जागत राहिला,
पण पेपरफुटीच्या एका खेळाने, वर्षांचा अभ्यास जाळला!

उधार काढून फी भरली, पोटाला चिमटा घेतला,
गाव सोडून शहर गाठलं, ध्यास नोकरीचा घेतला;
परीक्षेच्या त्या चार तासांत, आयुष्य पणाला लागलं,
आणि कुणाच्या पैशांच्या खेळात, त्याचं भविष्यच हरवलं!

पेपर स्वतःहून फुटत नाही, हे लक्षात ठेवा जरा,
त्याला फोडणाऱ्या हातांवर, प्रश्न विचारा खरा;
काहींच्या लालसेसाठी का, हजारो स्वप्नं विकायची?
मेहनतीच्या लेकरांची का, पुन्हा पुन्हा परीक्षा घ्यायची?

ज्याच्याकडे पैसा त्याला, आधीच प्रश्नांची चाहूल,
ज्याच्याकडे कष्ट त्याच्या वाट्याला, पुन्हा निराशेची धूळ;
ही केवळ परीक्षा नाही, हा विश्वासाचा प्रश्न आहे,
पेपर फुटतो तेव्हा एका विद्यार्थ्याचं नाही—संपूर्ण व्यवस्थेचं भविष्य फुटते आहे!

आता तरी जागे व्हा, या स्वार्थाला लगाम घाला,
मेहनतीच्या प्रत्येक लेकराला, त्याच्या हक्काचा न्याय द्या;
कारण पेपर नाही फुटत फक्त, नशिबं फुटतात, स्वप्नं फुटतात,
आणि पेपरफुटीच्या राखेत, कित्येक घरांची आशा जळत राहते!

मनोज परसराम शिंदे
ता पालम जिल्हा परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे