
0
4
8
2
9
3
नंदलाला
देवकीचा बाळ
यशोदे घरी वाढतो..
नंदबाबांचा कुशीत
आनंदात खेळतो…
अरे नंदलाला तुझ्या
मुरलीच्या सुरांने पशु-पक्ष्यांना ही
मुरलीधर वेड लावतो..
मथुरेचा देवकी नंदन
गोकुळी येऊन तू
गोपिका संगे रास खेळतो..
देवांचा ही देव कृष्ण मुरारी
बाललीलेत कसा रमतो….
दही,दुध,लोणी खातो चोरून
गोपिंकाचे वस्त्र लपवितो…
नंदलाला,कान्हा,कन्हैया
गोपाळा, श्यामसुंदरा
जगाचा पालनहार तू
मी बाळ अजाण माझे रक्षण करी
तुझा हात माझ्या शिरी
तुला त्रिवार नमन माझे श्रीहरी..
मृदुला कांबळे
गोरेगाव -रायगड
========
0
4
8
2
9
3



