Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबई

जि प शाळा नेवासा (बु) येथे शालेय दिंडीत विठ्ठल नामाचा जयघोष

अवघा परिसर विठ्ठल नामस्मरणाने दुमदुमला

0 1 8 3 2 0

जि प शाळा नेवासा (बु) येथे शालेय दिंडीत विठ्ठल नामाचा जयघोष

अवघा परिसर विठ्ठल नामस्मरणाने दुमदुमला

दिंडीत सुमारे १८१ विद्यार्थांचा सहभाग

जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर

नेवासा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा बुद्रुक ता. नेवासा या शाळेची श्री. नाथबाबा मंदिर या ठिकाणी आज दिनांक ०३/०८/२०२४ शनिवार रोजी शालेय दिंडी काढण्यात आली. शाळेत विठ्ठल..विठ्ठल..विठ्ठला या नामस्मरणाने दिंडीची सुरुवात झाली व वातावरण दुमदुमून गेले. सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा करत, टाळ, ढोलकी, हाती भगवी पताका घेऊन गावात आल्यानंतर ज्ञानोबा माउलींच्या जयघोषात रिंगण साजरी करण्यात आले व थाटामाटात दिंडी शाळेपासून नाथबाबा मंदिर परिसर याठिकाणी नेण्यात आली.

यामध्ये सुमारे १८१ विद्यार्थी सहभागी झाले होते. दिंडीचे मुख्य आकर्षण विठ्ठल रुक्मिणी , पालखी, ढोलकी वादक, सुंदर वेशभूषेतील वारकरी यामुळे दिंडीला शोभा आली. तसेच सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, व माऊली माऊली या भक्ती वरील सुंदर नृत्याने गावकरी भारावून गेले , शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पाखरे सर यांनीही बाल वारकऱ्यांच्यासोबत पावली खेळण्याचा आनंद लुटला अशाप्रकारे सुंदर कार्यक्रम पार पडला.

यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पाखरे सर व सहशिक्षक श्री घुले सर, श्री दळवी सर, सहशिक्षिका श्रीमती ताके मॅडम, श्रीमती बोर्डे मॅडम, श्रीमती वाघमारे मॅडम, श्रीमती कुलकर्णी मॅडम सर्वांचे कार्यक्रमासाठी योगदान व मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी नेवासा येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 3 2 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे