Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूरविदर्भ

शिक्षक कृती समितीची सहविचार सभा संपन्न

रजत डेकाटे, प्रतिनिधी

0 4 8 2 9 4

शिक्षक कृती समितीची सहविचार सभा संपन्न

रजत डेकाटे, प्रतिनिधी

नागपूर/मौदा (दि. 21): शिक्षक कृती समिती तालुका मौदाची सहविचार सभा जि प प्राथमिक शाळा मौदा येथे श्री चंद्रशेखर सावरकर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली . सभेमध्ये शासनाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात होणाऱ्या सामूहिक रजा आंदोलनात मौदा तालुक्यातील 100% शिक्षकांना सहभागी करून घेऊन शासनाला आपली एकजूट दाखवणे, शिक्षकांच्या विविध समस्या या विषयावर चर्चा करण्यात आली व निर्णय घेण्यात आले.

सभेचे प्रास्ताविक श्री रविंद्र चावट सचिव शिक्षक कृती समिती मौदा यांनी केले तसेच सभेला श्री वासुदेव भुते, श्री. जुगलकिशोर बोरकर, श्री आखडणाथ नानोटकर, सौ निर्मला मसकर ,श्री अभय बुद्धे, व अध्यक्ष श्री चंद्रशेखर सावरकर यांनी आपले प्रखर मत वक्त केले. व दिनांक 25 सप्टेंबर 24 ला होणाऱ्या सामूहिक रजा आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे होणाऱ्या मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुधीर कांबळे व आभार प्रदर्शन श्री अशोक ठाकरे यांनी केले. सभेला श्री नंदकिशोर वंजारी, श्री रमेश घायवट,श्री गजानन बेले, श्री अशोक हटवार, श्री अनिल पत्रे, श्री नरेश शेंडे, श्री वसंता पत्रे, श्री राजू नवनागे श्री अनिल थोटे, श्री कमलाकर ठोसरे, श्री विनोद पाटील, श्री राजेंद्र उके, श्री हेमराज वैद्य, श्री प्रदिप व्हाराडे, श्री कवडू शेंडे, श्री मनोज गुढदे,श्री विनोद हिरवे,श्री किशोर नागदिवे,श्री ज्ञानिवांत वैद्य,श्री प्रमोद डहाके श्री अनिल गडपायले,श्री गुलाब सावरकर, श्री डी एस ठोंबरे,श्री जे आर वलधरे श्री अरविंद ठोंबरे,श्री जितेंद्र शेंडे,सौ शालिनी राठीड, सौ ज्योती माशीदकर व मौदा तालुक्यातील शेकडो शिक्षक हजर होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे