सेवानिवृत्ती निमित्त केंद्रप्रमुख बी डी धुरंधर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची विविध स्तरातून उल्लेखनीय दखल
सेवानिवृत्ती निमित्त केंद्रप्रमुख बी डी धुरंधर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची विविध स्तरातून उल्लेखनीय दखल
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
बुलढाणा: शहरातील अटाळी केंद्राचे केंद्रप्रमुख तथा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष बी डी धुरंधर सर हे दिनांक 31 ऑगस्ट 2024 ला केंद्र प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाले ,त्यांनी 37 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल विविध स्तरातून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात येऊन त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.
विशेष म्हणजे जळगाव जामोद येथे आदिवासी बहुल गावात कार्यरत असताना 1988 साली बहुमानाचा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक आदर्श पुरस्कार प्राप्त झालेला आहे. गवंढाळा येथे प्रभारी मुख्याध्यापकांच्या कार्यकाळात , शिस्तप्रिय शिक्षणाधिकारी डी आर देशमुख यांनी शिक्षण परिषदेमध्ये भेट देऊन शैक्षणिक कार्याची दखल घेऊन दोन तास थांबून त्यांचे अभिनंदन करून प्रशंसा केली होती. तसेच माक्ता येथे त्यांनी उल्लेखनीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्य केलेले आहे. भालेगाव येथे उच्चश्रेणी मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख पदाचा प्रभार सांभाळून त्यांनी बंद असलेला आठवा वर्ग संघटनेच्या विभागीय अध्यक्ष पदाचा वापर करून जि.प.च्या पूर्वपरवानगीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून सुरू केला आणि त्यांच्या कार्यकाळात शाळेची पटसंख्या 232 वरून 307 झाली होती.
लोकसहभागातून त्यांनी शाळेचा चेहरा मोहरा बदलून शाळेचा कायापालट केलेला आहे. यासाठी केंद्र शाळा भालेगाव येथे सुद्धा शिक्षणाधिकारी ऐजाज उल्लाखान यांनी सुद्धा भेट देऊन त्यांच्या कार्याची दखल घेऊन गुणगौरव केला होता.सरते शेवटी अटाळी येथे केंद्रप्रमुख म्हणून रुजू झाल्यानंतर अल्पावधीतच योग्य आणि अचूक मार्गदर्शनाने केंद्र शाळा अटाळीला मागील वर्षी 2023 -24 मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तालुक्यातील दुसरा क्रमांक प्राप्त झाला आणि शाळेला दोन लाखांचे बक्षीस मिळाले. तेंव्हाही जि .प .चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा केंद्र शाळेला प्रशस्तीपत्र देऊन गुण गौरव केला.
केंद्रप्रमुख बी डी धुरंधर सर यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल, शिक्षण परिषद अटाळी येथे सर्व मुख्याध्यापक,शिक्षक बांधवांतर्फे , दि 30 ऑगस्ट 24ला भेट वस्तूंसह सापत्नीक सत्कार केला. दि 31 ऑगस्ट 2024 ला कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि मित्र संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पतसंस्थेच्या सभागृहात, तर
दि 1 सप्टेंबर 2024 ला ,पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या आमसभेमध्ये, दि 4 सप्टेंबर 24 ला पंचायत , समिती समग्र शिक्षा कार्यालयात मा.गटशिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सर्व केंद्रप्रमुख बांधव आणि साधन व्यक्ती यांच्यावतीने भेटवस्तूंसह सापत्निक सत्कार करण्यात आला.
तसेच त्यांच्या निवासस्थानी सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा. देवाभाऊ हिवराळे आणि सर्व पदाधिकारी, धम्मगुरु पूज्य भंतेजी राजज्योतीजी, भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष मा.दादारावभाऊ हेलोडे, आणि पदाधिकारी याशिवाय जुनी पेन्शन संघटना पदाधिकारी, माळी महासंघाचे पदाधिकारी इतिहास संशोधक, पत्रकार वकील ,सरपंच विविध स्तरातील शेकडो मान्यवर बांधवांनी घरी येऊन सेवानिवृत्ती निमित्त दि.11 सप्टेबर रोजी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.





